🕒 1 min read
मुंबई : भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीवर घणाघात केला आहे. रझा अकादमी अतिरेकी संघटना असून या संघटनेचा अध्यक्ष अफगाणिस्थानमधून काम पाहतो. मुळात त्रिपुरात मशिद जाळलीच गेली नाही. ही घटना साफ खोटी आहे. महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीने मला एक फोटो दाखवावा, असे आव्हान नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीला दिले आहे.
यावेळी बोलत असतांना राणे म्हणाले की, ‘रझा अकादमीचा अध्यक्ष अफगाणिस्थानमधून काम पाहतो, पूर्ण मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे काम रझा अकादमी करत आहे. या संघटनेचा मुळ संसथापक अफगाणिस्थानचा आहे, आणि त्यांच्याकडून आम्ही काय वेगळी अपेक्षा ठेवायची, तालीबानमध्ये काय चाललय हे आपण पाहतच आहोत, मुंबईत त्यांचं कार्यालय आहे. हे काय समाजसेवकाचे काम करतात, काय सेवाभावी संस्था आहे का ही, जेव्हा देशाचे पंतप्रधानानी त्रिपल तलाकचा निर्णय घेतला, त्यावर रझा अकादमीने विरोध केला होता. मुस्लीम समाजाचा विकास हे रझा अकादमीला मान्य नाही. त्यामुळे या संघटनेने कोरोना लसीला नकार दिला होता.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मुळात मशिद जाळलीच नव्हती. मोर्चा काढण्याचे कारणच नव्हते, मग या मोर्चाला महाविकास आघाडी सरकारने परवानगी कशी दिली. शांतता प्रिय मोर्चा काढायचा होता मग रझा अकादमीने पोलिसांवर दगडफेक का केली? नुकसान का केले? हा प्रश्न महाविकास सरकारने रझा अकादमीला का विचारला नाही. मोर्चे निघताहेत मोठ-मोठे मोर्चे निघत आहेत. त्याची प्लॅनिंग कशी आणि कुठे झाली? याचीही माहिती माझ्याकडे आहे. रझा अकादमी अतिरेकी संघटना आहे. हे मी जबाबदारीने म्हणतो, जसे अतिरेकी संघटना काम करतात तशी ही रझा अकादमी काम करते’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’

