Share

मोदींच्या विरोधात सक्षम चेहरा नाही असं म्हणता येणार नाही- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधकांकडे मोदी विरोधात सक्षम चेहरा नसल्याची चर्चा त्यांनी आणीबाणीच्या काळातील दाखला देत फेटाळून लावली आहे.

पवार निफाड दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोदी विरोधात विरोधकांकडे सक्षम चेहरा नाही ? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभे राहिले. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असे म्हणता येणार नाही.’

दरम्यान, इडीच्या धाडसत्रासंदर्भात बोलतांना म्हणाले की, ‘काही ठराविक अधिकाऱ्यांच्या मार्फत ठराविक व्यक्ती किंवा विचारधारेंच्या लोकांना कसा त्रास देणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोनच आहे. धाडी, चौकशा हा आता नित्याचा भाग झालाय. त्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय. विशिष्ट अधिकाऱ्यांना विशिष्ट ठिकाणी नियुक्त केले जातेय. मुदतवाढ दिली जातेय. आम्ही आता त्याची चिंता करत नाही. सुरुवातीला आम्ही अस्वस्थ व्हायचो. आता या सगळ्याला तोंड द्यायची मानसिकता तयार झाली आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!