🕒 1 min read
पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच कलाकारांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या ट्विटवरून बाबासाहेब पुरंदरे याना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं, हेच भाग्य समजतो. विनम्र अभिवादन आणि मुजरा शिवशाहीर बाबासाहेब. असं केदार शिंदे म्हणाले.
या भेटीच्या निमित्ताने इतिहासाच्या जवळ जाता आलं, हेच भाग्य समजतो. विनम्र अभिवादन आणि मुजरा शिवशाहीर बाबासाहेब…. #बाबासाहेबपुरंदरे #बाबासाहेब_पुरंदरे pic.twitter.com/4fJMAjnT5S
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) November 15, 2021
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात येत आहे. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते तसेच कलाकारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
