Share

‘आम्ही जुळवून घ्यायचं ठरवलंय, तुम्ही दिवस मोजत बसा’

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून सरकार पडण्याची भाषा किंवा वक्तव्ये केली गेली. मात्र महाविकास आघाडीच्या नेते, मंत्र्यांकडून हे सरकार 5 वर्षे टिकणार असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. भाजप हे सरकार पाडण्याचे कितीही प्रयत्न करो पण 5 वर्षे हे सरकार कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगितलं गेलं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना याच मुद्द्यावरुन जोरदार टोला लगावला आहे.

आम्ही एकमेकांशी जुळवून घ्यायचे ठरवले आहे, तुम्ही मात्र हे सरकार जायचे दिवस मोजत बसा, अशी जोरदार टोला शरद पवार यांनी विरोधकांवर लगावला आहे. मालेगाव आणि अमरावती हिंसाचार प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले की, काही संघटना जाणीवपूर्वक अशा घटना घडवत आहेत आणि हे सगळं येणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन असे कृत्य घडवण्यात येत असल्याची टीका यावेळी शरद पवारांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यावर देखील पवारांनी भाष्य केलं आहे. ‘संपचा निर्णय कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून घेतला आहे, मात्र एकेकाळी सत्तेत असणारे लोकच या सांपाला वेगळे वळण देत आहेत. या सर्व राजकारणात मात्र कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत, त्यात एकादशीच्या दिवशी अनेक वारकरी वारीला जातात त्यांचे देखील या संपामुळे हाल होत आहेत’, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार हे व्यवस्थित असून हे सरकार कधी जाणार याची विरोधकांनी वाटच बघत बसावी, असा टोला देखील लगावला आहे.देशात तीन-चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत ते समोर ठेऊन विरोधी पक्ष अनेक ठिकाणी हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, अशी आवाहन देखील पवारांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!