Share

‘ड्रग्जचा पैसा देशविरोधात वापरत असेल तर मग सरकार काय करतंय?’

Published On: 

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले मत नोंदवले आहे. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना प्रतिसवाल केला आहे.

ड्रग्जचा पैसा देशविरोधात वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? नोटबंदी केल्यानंतर मोदींनीच दहशतवाद्यांना, माफियांना मिळणारा ड्रग्जचा पैसा बंद होईल असं सांगितलं’. असे परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मोहन भागवत जे म्हणाले आहेत ते योग्य बोलले आहेत. ते जे मत मांडतात त्याचं महत्व असतं. पण जर नार्कोटिक्स, ड्रग्जचा पैसा देशविरोधात कोणी वापरत असेल तर मग सरकार काय करतंय? सरकार कोणाचं आहे? सरकारचं प्रमुख कोण आहे? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.

दरम्यान तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाहीये. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही. असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!