Share

किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Published On: 

मुंबई : अभियंता अपहरण आणि मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांंना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायलयात हजरही करण्यात आलं. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६५, ३२४, १४३, १४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात आव्हाड यांच्यावर आज अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

अनंत करमुसे यांची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. एफआयआर नोंद होऊन दीड वर्ष उलटल्यानंतरही आव्हाड यांच्यावर कारवाई होत नसल्याचे करमुसे यांच्याकडून हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई केली असण्याची शक्यता आहे. करमुसे यांची याचिका कदाचित पुढील आठवड्यात सुनावणीला येणार आहे.

दरम्यान, आता भाजपचे दबंग नेते किरीट सोमय्यांनी अनंत करमुसेंची भेट घेतली आहे. ते अनंत करमुसे आणि वकिल अनिरुद्ध गानू यांना घेऊन काही वेळात वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा फाॅलोअप घेणार आहेत यामुळे आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमय्या यांनी करमुसे यांच्या घरातील लोकांची विचारपूस देखील केली आहे.

दरम्यान, काल याबाबत प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला होता. “सव्वा वर्षानंतर शेवटी कोर्टाने न्याय दिला. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अनंत करमुसेला न्याय मिळाला. आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये. आम्ही राज्यपालांकडे जितेंद्र आव्हाड यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. “, असं किरीट सोमय्या त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!