🕒 1 min read
नवी-दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव होत असतांनाच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. परंतु विरोधक आता गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ‘नेतेगिरी म्हणजे कोणालाही लुटणे नाही. फॉर्च्युनरने कुणालाही चिरडायला आलेलो नाही. तुम्हाला तुमच्या वर्तनामुळेच मते मिळतील. तुम्ही राहता त्या परिसरात जर दहा लोकांनी तुमची स्तुती केली तर माझी छाती रुंद होईल.
#WATCH | Lucknow: UP BJP chief Swatantra Dev Singh says, "A tea seller, born in a poor family, became a CM, the PM of the nation. He said 'Na Khaunga, Na Khane Dunga'…Being a political leader doesn't mean that you loot, it doesn't mean that you mow down anyone by Fortuner…" pic.twitter.com/yGAA9jIpTW
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 10, 2021
दरम्यान, पुढे बोलतांना तुमच्या वर्तनातून मते मिळतील असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही कसे वागता? हे खूप महत्त्वाचे आहे. असे तर नाही की तुम्ही तुमच्या घराबाहेर पडल्यानंतर लोक तुमच्यापासून दूर जातात, असेही यावेळी स्वतंत्र देव सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल’
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे – मेहबूबा मुफ्ती
- आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

