🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे. दरम्यान, मनसेने मात्र या बंदला विरोध केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मनसेवर टीका केली होती. लखीमपूर हत्याकांडाला मनसेचा पाठिंबा आहे का? असा सवाल मनसेनं विचारला होता. त्याला आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे.
अमेय खोपकर म्हणाले की, शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच. जनतेच्या जीवाशी खेळ करून राजकारणाची पोळी भाजण्याचा महाभकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.
* सुरु राहू दे तुमचं राजकारण, बंद नको चित्रीकरण*
लखीमपूर येथील दुर्दैवी दुर्घटना,शेतकरी आंदोलन याबद्दल आम्हाला नक्कीच सहानुभूती आहे. पण त्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’चा हाक देणाऱ्या महाविकास आघाडीला विनंती आहे की ११ ऑक्टोबरला चित्रपट,वाहिन्यांवरील मालिका यांचे चित्रीकरण सुरु ठेवावेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 10, 2021
उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारून राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारणासाठी बंद करून जनतेची अडवणूक करू नका; प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा; माजी आमदार मोहन जोशी यांची खरमरीत टीका
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘लग्नासाठी धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करतायत’; भागवतांनी व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
