Share

टी 20 विश्वचषकासाठी निवडलेल्या टीम इंडियात होणार का बदल?, BCCI कडून मोठी माहिती समोर

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच भारतीय संघाची आयसीसी टी -20 विश्वचषकासाठी निवड झाली. 15 सदस्यीय संघाची निवड निवड समितीने मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली केली. 3 खेळाडू राखीव ठेवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा निवड समितीसोबत बसून या विषयावर चर्चा करणार आहेत.

बीसीसीआयने आयोजित केलेल्या टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. संघांना स्पर्धा सुरू होण्याच्या 7 दिवस आधी म्हणजेच 10 ऑक्टोबरपर्यंत अंतिम संघ निवडण्याची परवानगी आहे. यानंतर, संघात कोणतेही बदल केले जाऊ शकत नाहीत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात येईल अशी अटकळ होती यावरच आता बीसीसीआयने पडदा टाकला आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी  एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ‘ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कोणताही बदल होणार नाही. पण एखादा खेळाडू जखमी झाला तरच त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून नव्या खेळाडूचा समावेश होऊ शकतो.

यापूर्वी कॅप्टन विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत निवड समितीची एक बैठक होणार असल्याचे वृत्त समोर आले होते, मात्र अशा प्रकारची कोणतीही औपचारिक बैठक होणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!