🕒 1 min read
अबुधाबी : भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपली प्रियसी धनश्री वर्माशी लग्न केले आहे. ते दोघेही बर्याच दिवसांपासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये होते. चहल आणि धनश्री लग्नानंतर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसले आहेत. धनश्री नेहमीच आपले डान्स व्हिडीओ चहल सोबतचे फोटो शेअर करत असते. तसेच चहल देखील पत्नी धनश्री सोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.
नुकताच धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, या व्हिडिओ चहल आणि धमश्री डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत दोघेजण एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CUrQ69qpif2/?utm_source=ig_web_copy_link
धनश्री नेहमीच वेगवगेळ्या गाण्यावर डान्स करताना दिसते यावेळी तिने मात्र प्रसिद्ध पंजाबी गाणं ‘क्या बात हे’ यावर डान्स केला आहे. गायक हार्डी संधूचं हे गाणं देशभरात प्रसिद्ध असून या गाण्यावर आता चहल जोडीही नाचताना दिसत आहे. यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या बराच पसंतीस उतरत आहेत. तसेच या दोघांची केमिस्ट्री देखील अनेकांना आवडली आहे.
दरम्यान चाहल सध्या आयपीएलसाठी दुबईमध्ये आहे. चाहल आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या मोसमात आरसीबीने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तसेच यावर्षी तरी आयपीएल आरसीबी आयपीएल जिंकणार का याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांना आता साखर कडू वाटायला लागलीय का?; किरीट सोमय्यांचा तिखट सवाल
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
