Share

कोरेगाव भीमा हिंसाचार : विश्वास नांगरे पाटील, सुएझ हक आणि रश्मी शुक्ला यांची चौकशी करा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही, असा अहवाल पुण्यात सत्यशोधन समितीने पत्रकार परिषदेत सादर केला आहे. दंगल रोखता न येणे हे स्थानिक पोलिसांचे अपयश असून यामुळे पोलीस खात्याने कोरेगाव भीमा प्रकरणात विश्वास नांगरे पाटील, एसपी सुएझ हक यांच्यासह पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी या समितीने केली आहे.

सत्यशोधन अहवाल समितीने पत्रकार परिषदेत हा अहवाल आज प्रसिद्ध केला. यावेळी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत, सत्यशोधन अहवाल समितीचे सदस्य कॅप्टन स्मिता गायकवाड, सागर शिंदे, सुभाष खिलारे, दत्ता शिर्के, प्रदीप पवार आणि अॅड.सत्यजित तुपे उपस्थित होते.

कोरेगाव भीमा हिंसाचार: सत्यशोधन समितीच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे-

  • कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही.
  • 31 डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच,रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी .
  • वादग्रस्त व खोटा इतिहास सांगणारा फलक लावण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही
  • एटीएसने जानेवारी महिन्यात अटक केलेल्या संशयित माओवादी कोरेगाव भीमा यथे गेले असल्याचे व एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव हिंसाचाराचे लागेबांधे आहेत त्यांची चौकशी करावी
  • पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर कोरेगाव भीमा प्रकरण घडले नसते. पोलीस खात्याने कोरेगाव भीमा प्रकरणात विश्वास नांगरे पाटील, सुएझ हक एसपी यांच्यासह पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहखाते आणि मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली आहे त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी.
  • या हिंसाचारामागील सूत्रधार अनुषंगाने 31 डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच,रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी
  • पूजा सकट मृत्यू प्रकरणाबद्दल सर्वांनाच संवेदना आहेत मात्र यामागे संघाचा हात असल्याचा दावा करणे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे.याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांना संघाची कावीळ झाली आहे- माजी खासदार प्रदीप रावत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!