Share

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : लखीमपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर तसेच केंद्रावर टीकास्त्रांचा प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती देत राऊत यांनी ट्विट केले आहे की,’लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारन अटक केली आहे. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे’ असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहेत.

दरम्यान, लखीमपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक जीप शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचे बघायला मिळत आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. फक्त एवढेच नाही तर सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी ३६ तासांनी कारवाई केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची होणारी भेट महत्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!