🕒 1 min read
मुंबई : हास्य, विनोदी नट म्हणून अभिनेता परेश रावल चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचा ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल साकारला जाणार आहे. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावलऐवजी पंकज त्रिपाठी दिसणार असून परेशच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान अभिनेता अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना घेतल्यामुळे नेमकं कारण काय? असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. मात्र रावल यांनी सांगीतलेली रक्कमेच्या मागणीमुळे चित्रपटाच्या बजेटवर परिणाम होईल असे वाटत होते. याशिवाय परेश रावल यांनी निर्मात्यांना आणखी एक प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. प्रयत्न करुनही परेश रावल यांनी भूमिकेसाठी काहीही प्रतिसाद न दिल्याने अखेर पंकज त्रिपाठीला या चित्रपटाच्या मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आल्याचं सुत्रांच म्हणणं आहे.
येत्या काही दिवसात ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री यामी गौतमही दिसणार आहे. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘देवा’च्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती उमेश शुक्लांऐवजी अमित राय करणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
