🕒 1 min read
मुंबई : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमय्यांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. सोमय्या आज शिवडी न्यायालयासोमर हजर झाले. सोमय्या यांनी ट्वीटर वरुन केलेल्या ट्वीट प्रकरणी दोषी नसल्याचा दावा केला.
प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कथित बदनामीकारक वक्तव्यासाठी सोमय्या यांच्याविरोधात अर्थ स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते कलमे यांनी दोन स्वतंत्र बदनामीचे खटले न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ नोव्हेंबरला होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग आणि एसआरए तसेच म्हडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये वरुल करण्याते आदेश कलमे यांना दिले आहेत. कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केला होता. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे संस्थेची बदनामी झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले आहेत. मात्र, आता कलमे यांनीसुद्धा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन बिल्डरसाठी सोमय्या यांनी जिवाचे रान केले आहे. त्यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येते, असा आरोप कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
