🕒 1 min read
नाशिक – “नाशिक-मुंबई महामार्गाच्या 6 पदरीकरणासह सिमेंट कॉंक्रीट रस्त्यासाठीच्या 5 हजार कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून आवश्यक तिथे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत त्यामुळे भविष्यात नाशिक- मुंबई अंतर २ तासात कापणही शक्य होईल,” असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
गडकरी यांच्या हस्ते नाशिकच्या के के वाघ महाविद्यालय ते आडगाव दरम्यान विस्तारित केलेल्या उड्डाणपूलासह 2 हजार48 कोटींच्या प्रकल्पांचं काल लोकार्पण करण्यात आलं;त्यावेळी ते बोलत होते. सुरत -चेन्नई या दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या 50 हजार कोटींच्या महामार्गापैकी नाशिक जिल्ह्यातून 122 किलोमीटरचा मार्ग जात असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
भिवंडी, बदलापूर आणि मीरा-भाईंदरच्या 1 लाख कोटींच्या लॉजिस्टीक पार्क प्रमाणे नाशिक परिसरातही लॉजिस्टीक पार्क उभारण्यात येईल असं गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी गडकरींचं कौतुक करता करता मंत्री छगन भुजबळ यांनी गडकरींना मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले.
फक्त मुंबई-नाशिक रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे गडकरी साहेबांनी पुढच्या वेळी मुंबईहून नाशिकला येताना कारने यावे. म्हणजे रस्त्यावर किती खड्डे पडलेत हे कळेल आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय लगेच होईल. मात्र, आताही नितीन गडकरी रस्त्यांची घोषणा करतील आणि उद्याची हेडलाईन तीच असेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
