🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ रोखठोकमधून भाजपावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. याला अनुसरून राऊतांनी मोदींवर टोलेबाजी केली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टोला लगावत राऊत म्हणाले की,’ज्यांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले, त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी आहे. अनेक विद्यार्थी, उद्योजक मंडळींचे वांदे झाले अनेकांना युरोप-अमेरिकेच्या विमानतळावरूनच त्यांच्या देशात प्रवेश करू दिला नाही. आपल्या पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. तरी ते खास विमानाने अमेरिकेत पोहोचले. नियम फक्त सामान्यांना, मोठ्यांना नाही का असं विचारलं तर भाजपाचे लोक म्हणतील छे छे, मोदी है तो मुमकिन है! मोदींना कोण अडवणार? हेसुद्धा एक मनोरंजन आहे’ असेही राऊत लेखात म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे’ असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत संघर्ष अटळ ? मुंबईत काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढण्यावर ठाम !
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
