Share

महामानवाची १२७ वी जयंती ; देशभरात कार्यक्रमाची मांदियाळी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येनं भीमबांधव नागपुरातील दिक्षाभूमीत येत असतात. तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.

तसेच, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद मध्य प्रदेशातील महू या आंबेडकरांच्या जन्मस्थळी आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहणार आहेत.

भारतातील जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं मोठं काम डॉ. आंबेडकरांनी केलं. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ यातून त्यांचं योगदान मौल्यवान ठरलं आहे. त्यांचं विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग, यातून ते सर्वांचेच प्रेरणास्त्रोत बनले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!