🕒 1 min read
पुणे: आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी एक महत्वाची सूचना पुरातन विभागाला केली आहे.
किल्ले सिंहगड परिसर विकासासाठी सिंहगड परिसराच्या पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग केला जाणार आहे. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असणार आहे. पर्यटकांसाठी स्वच्छता गृहाचीदेखील सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा, हा दृष्टिकोन समोर ठेऊन विकास करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावं. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारखे स्थानिक पदार्थ उपलब्ध करून द्यावेत. किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 17, 2021
तर पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. पर्यटकांना याठिकाणी पिठलं-भाकरीसारखे स्थानिक पदार्थ उपलब्ध करून द्यावेत.तसेच किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करणार’, एकनाथ शिंदेंची घोषणा
- … म्हणून पाकिस्तानविरोधात एकही सामना न खेळातच न्यूझीलंड तातडीनं मायदेशी परतणार
- रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं-संजय राऊत
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला, पण समस्यांमधून मुक्त करण्यासाठी आघाडी सरकार साथ देईल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
