🕒 1 min read
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता लखनौ इथं वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी परिषदेची 45 वी बैठक होणार आहे. कोरोना संसर्गाच्या उद्रेकानंतर जीएसटी परिषदेची थेट उपिस्थितीत होणारी ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं.
दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्याने महागाईत भर पडली आहे. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लखनऊमध्ये होत असलेल्या वस्तू व सेवा कर कायदा (GST) परिषदेत काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. जीएसटी परिषदेत याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. यावेळी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणायला मंजूरी मिळाली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर एका फटक्यात 25 रुपयांनी कमी होऊ शकतात.
इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्याने राज्यांना त्यावरील कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे राज्यांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आजच्या जीएसटी परिषदेत काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही रिषभ पंत कर्णधार; दिल्ली कॅपिटल्सची घोषणा
- विराट कोहली कर्णधारपद सोडणार; थोड्याचवेळा पूर्वी केली मोठी घोषणा
- ज्या विद्यापीठाने आर्थिक बोजामुळे १२ अभ्यासक्रम बंद केले; ते संतपीठ कसे चालवणार?
- दुर्लक्षित आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्या, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची बँकांना सूचना
- दिल दिवाना..गाणं लोकप्रिय करणारे राम-लक्ष्मण ; जयंतीनिमित्त्य वाचा त्यांचा संगीतप्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
