Share

भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यातील एक आरोपी महाराष्ट्रातील आहे असं समोर आले आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.

जान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेला खूप आधी दहशतवाद्यांचा सुगावा लागला होता. गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काम सुरू केलं आणि त्यांच्या तपासाला यश आलं. हे दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ल्या करण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांना अल कायदा, आयएसआयएस यासारख्या दहशतवादी संघटनांसह अंडरवर्ल्डची त्यांना साथ होती. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस हा फंडिंग करत होता. आयएसआयएस त्यांना शस्त्रास्त्र देत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!