Share

‘त्या’ हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

Published On: 

वेब टीम – नवी दिल्ली
लातूरमध्ये मागील महिन्यात 25 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच कोसळल होत. यात मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण अपघातातून थोडक्यात बचावले.

यानंतर आता हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिला आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली आणि अहवाला सादर केला. प्राथमिक अहवालानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाली.

तरीही पायलटने उड्डाण केलं!
त्या दिवशी तापमान जास्त होतं. पण हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

अवघ्या 1 मिनिटांत कोसळले हेलिकॉप्टर
25 मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण केलं. मात्र अवघ्या 1 मिनिटाच्या आतच पायलटने हेलिकॉप्टर खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्या मार्गात वीजेचा खांब आला. त्याचवेळी वीजेच्या ताराही  हेलिकॉप्टर मार्गात आल्या. दरम्यानच्या काळात वीजपुरवठा खंडीत झाला होता. क्षणार्धात हेलिकॉप्टर कोसळलं. वीजपुरवठा असल्यामुळे आणि हेलिकॉप्टर उंचीवर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!