🕒 1 min read
मुंबई: साधारण मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. आत याबाबतीत अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी गंभीर इशारा दिला आहे. यावर राजन यांनी सद्यस्थितीमधील डिजिटल विभाजनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले कारण, अनेक मुलं उपकरणं किंवा इंटरनेटच्या अभावामुळे या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत. त्यांनी म्हटले आहे की, मुलांच्या या संपूर्ण पिढीचा विचार करा, यापैकी ३०-४० टक्के शिक्षण सोडून देतात, कारण, ते सहजतेने याला सामोरे जाऊ शकत नाहीत. ही एक मोठ्याप्रमावरील आपत्ती आहे.
मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे. असं राजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान कोरोनामुळे राज्यातील शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान तर झालेच शिवाय बालभारतीने नवीन पुस्तके रद्दीत विकण्याचा निर्णय घेतला. यामुळेदेखील ठाकरे सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेतजर तुम्ही दीड वर्षापासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल , असा गंभीर इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनंदाच्या मृत्यूनंतर झालेले आरोप दु:स्वप्नापेक्षा कमी नव्हते; शशी थरूर भावूक
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन


