Share

…म्हणून कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचं आंदोलन; मात्र शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनीच घेतलं ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कर्नाटक शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनुळी टोल नाक्याजवळ तपासणी नाका उभारून RTPCR चाचणी अहवाल असल्याशिवाय एकही प्रवासी वाहन न सोडण्याची कारवाई सुरू केली आहे. सीमा भागातील अनेक गावात जाण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोकांना कर्नाटक हद्दीतील महामार्गावरूनच जावे लागते. या महाराष्ट्रवासियांची मोठी गैरसोय होत आहे.

कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने कोरोना अहवालाची सक्ती केली आहे. यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाटक सरकारने ही तपासणी महामार्गावर न करता आपल्या गावांच्या वेशीवर करावी, अशी मागणी करत कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कर्नाटकातून एकही वाहन महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता.

आज शिवसेनेतर्फे या तपासणी नाक्यावर आंदोलन करण्यात आले. या वेळी कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनीही पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. पण आम्हाला वरून आदेश आहेत आम्ही यात बदल करू शकत नाही, असे कर्नाटक पोलिसांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळी कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न तसेच कर्नाटकातुन महाराष्ट्रात येणारी कर्नाटक पासिंग वाहने अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना जिल्हा प्रमुख विजयराव देवणे, संजय पवार , तालुका प्रमुख अशोक पाटील, दत्ता सावंत, विद्या गिरी, वैभव आडके, यांच्यासह पंधरा ते सोळा शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलीसांनीच ताब्यात घेतले. आणि दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!