Share

पुणे शहरात आज नव्याने २५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने २५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार ७१६ इतकी झाली आहे. शहरातील ३२७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७४ हजार १९३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ९८७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ३९ हजार ६८५ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ७९२ रुग्णांपैकी २३१ रुग्ण गंभीर तर ३४९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७३१ इतकी झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!