Share

कार चालवण्याचा खर्च होणार कमी; सरकारचा मोठा दिलासा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सध्या पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. यामुळे सामान्य माणसाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कार चालवण्यासाठी अधिक खर्च होतो. मात्र आता तुमचा हा खर्च आता कमी होणार आहे. पर्यायी इंधन इथेनॉलच्या वापराने हे शक्य होणार आहे.

रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी  यांनी पुढील जवळपास १० दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचं इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य केलं जाईल. फ्लेक्स फ्यूल (Flexible Fuel) हे इंधन जे पेट्रोलच्या जागी इथेनॉलवरही चालवलं जाऊ शकतं. या पर्यायी इंधनाची किंमत ६० ते ६२ रुपये प्रति लीटर असेल, तर पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रति लीटरहून अधिक आहे. यामुळे इथेनॉल इंधनावर कार चालवणं ४०%पर्यंत स्वस्त होऊ शकते.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, या इंडस्ट्रीसाठी एक आदेश जारी करणार आहे. आता केवळ पेट्रोल इंजिनच असणार नाही, तर Flex-Fuel Engines ही असतील. येत्या ८ ते १० दिवसांत फ्लेक्स फ्यूल इंजिन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

ब्राझिल, कॅनडा आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्यूल इंजिनचं प्रोडक्शन करत आहेत. या देशात ग्राहकांना १०० % पेट्रोल किंवा १०० % इथेनॉलचा पर्याय देण्यात येत आहे. सध्या प्रति लीटर पेट्रोलमध्ये ८.५  % इथेनॉल ब्लेंडिंगची मंजुरी आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण १ ते १.५  टक्के होतं. इथेनॉलची खरेदीही ३८ कोटी लीटरवरुन ३२० कोटी लीटरपर्यंत पोहचली आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!