🕒 1 min read
पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपने रान उठवण्यात सुरवात केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आज पंढरपुरात विविध समाजातील प्रमुखासोबत घोंगडी बैठकांचे आयोजन केलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे.
यावर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, मराठा समाजाला जेव्हा आरक्षण देण्यात आलं तेव्हा मराठा नेत्यांनी सांगितले की, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको तसं देता येत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की, ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवून मराठा समजाला आरक्षण दिले आहे. मराठा नेत्यांचेही हेच मत आहे की, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ नये. या गोष्टीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पुर्णपणे अपयशी ठरले आहेत.
दरम्यान आज पडळकर यांनी ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, ‘भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत आता का सत्तेच्या हव्यासापोटी लाचार होऊन काका पुतण्यासमोर माना डोलावून मुग गिळून गप्प आहेत? घटनेच्या ३४० कलमानुसार OBC ना आरक्षणाच्या सोयी लागू करण्याच्या हेतूने आयोगाचे गठन होत नव्हते, म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी दु:खी होऊन २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला होता. माननीय नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा व ते डॅा. बाबासाहेबांच्या आदर्शांना मानणारे आहेत, बहुजनांच्या बाजूने आहात हे सिद्ध करावे.’ असे मत त्यांनी मांडले आहे.
म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी दु:खी होऊन २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला होता. माननीय नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा व ते डॅा. बाबासाहेबांच्या आदर्शांना मानणारे आहेत, बहुजनांच्या बाजूने आहात हे सिद्ध करावे..#SoniaGandhi
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) June 15, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा’
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत! बदनामी प्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला
- राम जन्मभूमी खरेदीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला
- मायावतींना धक्का! बसपाच्या ९ बंडखोर आमदारांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

