🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतर देशात पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लसीमुळे एका ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे. लस दिल्यानंतर एखादा गंभीर आजार झाल्यास किंवा त्या व्यक्तीचा थेट मृत्यू झाल्यास त्याला वैज्ञानिक भाषेत अॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन अर्थात AEFI म्हणतात.
केंद्र सरकारने AEFI साठी समिती गठीत केली आहे. या समितीने लसीनंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अॅनाफिलेक्सिसमुळे (Anaphylaxis) ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अॅलर्जी आहे. वृद्धाला लशीचा पहिला डोस ८ मार्च २०२१ रोजी मिळाला होता आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. AEFI समितीचे चेअरमन डॉ. एनके अरोरा यांनी लशीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु, यासंदर्भात यापुढे त्यांनी काही बोलण्यास नकार दिला, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
लस घेणे सुरक्षितच
लसीकरणानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या २६ हजार २०० केसेसची नोंद देशात झाली. यातील केवळ ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला. २३ कोटी ५० लाख डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ०.०१ टक्के इतकी अत्यल्प आहे. यावरून लस घेणे सुरक्षितच असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खंडणी मागणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावे’; नितेश राणे कडाडले
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत! बदनामी प्रकरणी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला
- राम जन्मभूमी खरेदीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला
- मायावतींना धक्का! बसपाच्या ९ बंडखोर आमदारांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
