Share

दहावी पास उमेदवारांना संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  मागील वर्षापासून देशात  कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांना विविध अडचणींचा सामाना करावा लागला आहे. यातच या काळात अनेकजण बेरोजगार आले आहेत. मात्र आता एक चांगली बातमी देण्यात आली आहे. ते म्हणजे ग्रुप सी मध्ये भरतीची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे. यासाठी आता दहावी पास झालेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मंत्रालयांतर्गत एससी सेंटर साऊथमध्ये विविध नागरी पदांवर भरती होणार आहे. लेव्हल वनमधील सफाई कामगारांच्या 40 जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पे मॅट्रिक लेव्हल -२ मधील सिव्हिल मोटर चालक व काही काळ एकूण 60 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या पदांचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी काही चूक आढळल्यास फॉर्म नाकारला जाऊ शकतो त्यामुळे माहिती अचूक द्या. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज लिहून फॉर्म भरावा. या पत्त्यावर फॉर्म भरून आणि पात्रता, वयोमर्यादा आणि इतर पुरावे चिकटवून फॉर्म सबमिट करा. उमेदवारांना 12 जून 2021 ते  13 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

सर्व पदांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद आहे. तर द प्रेसाइडिंग ऑफिसर, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (साऊथ) – २ एटीसी, अ‍ॅडव्हान्स पोस्ट, बंगळुरू-07 या पत्त्यावर पाठवा.

पात्रता

  • सिव्हिल मोटर चालक पदासाठी अर्ज करण्यासाठी, मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून दहावी पास आणि दोन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असलेले हेवी व लाइट मोटर वाहन चालविण्याचा परवाना.
  • कुक पदासाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास. भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि संबंधित विषयात प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • सिव्हिलियन केटरिंग प्रशिक्षकासाठी, मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कॅटरिंगमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयातील प्रावीण्य असलेले उमेदवार क्लिनर पदासाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!