🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे.
यावर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार यांनी आपले मत सांगितले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही’, असेही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांना आज त्यांनीच पूर्णविराम दिला. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- पेटीएम अॅपद्वारे लसीकरण स्लॉट करता येणार बुक
- ‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला
- कसोटीचे महाभारत! सामना तेरावा, पंतच्या नाबाद खेळीने कांगारुचे गर्वहरण
- ‘त्या’ १२ आमदारांची यादी कुणाकडे ? माहिती अधिकारातून झालं उघड !
- कसोटीचे महाभारत! सामना बारावा, विहारी-अश्विनच्या प्रयत्नामुळे भारत सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

