🕒 1 min read
औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी मंदीरात लग्न लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपी तरुणाला एमआयडीसी पैठण पोलिसांनी रविवारी दि.१३ रात्री बेड्या ठोकल्या. कृष्णा बापुसाहेब वाघ (२३, हर्षी ता. पैठण) असे आरोपीचे नाव असून त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.जी. मीटकरी यांनी सोमवारी दि.१४ दिले.
प्ररकणात १५ वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीला दोन मुली व एक मुलगा असे तिन अपत्य आहेत. २४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादीसह त्याचे कुटूंब झोपी गेले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या लहान मुलीला जाग आली असता पीडिता घरात दिसली नाही, व घराचा दरवाजा देखील उघडा होता. फिर्यादीने पीडितेचा शोध घेतला मात्र ती न सापडली नाही. प्रकरणात एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना आरोपी व पीडितेला हे जालना येथील ढवळेश्र्वर मंदीर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले तर आरोपीला बेड्या ठोकल्या.
पीडितेची चौकशी केली असता तिने सांगितले की, आरोपीने तीला लग्नाचे आमिष दाखवून २६ मे रोजी रात्री एक वाजेच्या दुचाकीवर पळवून नेले. त्यानंतर आरोपीने पिडितेसोबत पार नदीच्या काठी असलेल्या मंदीरात लग्न केले. त्यानंतर आरोपीने जालना येथील ढवळेश्र्वर मंदीर परिसरातील राजूर रोड येथे एक किरायाचे घर घेतले व तेथे पीडितेवर अत्याचार केला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे आहे. आरोपीने पीडितेला कोठे कोठे पळवून नेले व आरोपीला गुन्ह्यात कोणी कोणी मदत केली याचा तपासकरणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

