🕒 1 min read
औरंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सेावमारी दि.१४ दिले. गौसखा कालेखा पठाण (३५, रा. नाणेगाव ता. सिल्लोड, ह.मु ब्रिजवाडी) आणि नवाबखा उस्मानखा पठाण (४०, रा. गोद्री ता. भोकरदन जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
शहाबाजार बक्कलगुडा येथे राहणारा अमान खान जफर खान (२१) याने ३० एप्रिल रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे दुचाकी (क्रं. एमएच-२०-डीझेड-७८७३) घरासमोर हॅन्डल लॉक करुन उभी केली असता चोरट्यांनी ती लंपास केली. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा आरोपींना अटक करुन पोलिसांनी अमान खान यांची चोरलेली दुचाकी आरोपींकडून जप्त केली. आरोपींना आज न्यायालात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी आरोपींनी दुचाकीवरील बनवाट नंबर प्लेट कोणाकडून बनवली तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेला भाजपची भीती वाटतेय की मित्रपक्षांवर भरोसा नाही ?
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा


