Share

कसोटीचे महाभारत! सामना बारावा, विहारी-अश्विनच्या प्रयत्नामुळे भारत सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा बारावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०७ ते ११ जानेवारी दरम्यान सिडनी येथे झाला होता.

सलग दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांची मजल मारली. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडुन सर्वाधीक १३१ धावांची शतकी खेळी साकारली. मार्नस लॅबुशेनने ९१ धावांची खेळी करत त्याला पुरेपुर साथ दिली. भारताकडुन रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. ३३८ धावांच्या अव्हानासमोर भारतीय संघाने पहिल्या डावात २४४ धावांची मजल मारली. सलामीवीर शुममन गील आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी प्रत्येकी ५०-५० धावांची अर्धशतकी खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाकडुन पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ गडी बाद केले होते.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची निर्णायक आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजी करत ६ बाद ३१२ धावांवर डाव घोषीत केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात कॅमेरुन ग्रिनने सर्वाधीक ८४ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला स्टिव्ह स्मिथ (८१) आणि लांबुशेन(७३ ) यांनी पुरेशी साथ दिली. तर भारताकडुन नवदीप सैनी आणि अश्विन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

चौथ्या डावात भारतासमोर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करायला भारतीय संघाचा मुख्य फलंदाज विराट कोहली संघात नव्हता. या सामन्यात जवळपास भारतीय संघाचा पराभव निश्चीत मानला जाऊ लागला. मात्र भारतीय संघाने हिम्मत सोडली नव्हती. दुसऱ्या डावात रिषभ पंतला विहारीच्या आधी पाठवुन भारताने विजयाचा इरादा स्पष्ट केला होता. पंतने सावध सुरवात केली. हळुहळु जम बसल्यावर त्याने नैसर्गीक फटकेबाजी सुरु केली. मात्र ९७ धावांवर पंत बाद झाल्यावर भारतावर पराभवाचे सावट उभे राहिले. त्यावेळी खेळपट्टीवर हनुमा विहारी आणि आर अश्विन हे दोन खेळाडु होते. पाठीच्या दुखण्याने ग्रस्त आर अश्विन आणि मांडीचे स्नायु आखडल्याने हनुमा विहारी त्रस्त होते.

रविंद्र जडेजाच्या बोटाला फ्रॅक्चर असुनही पॅड बांधुन तयार होता. मात्र विहारी आणि अश्विनने ही वेळ येउ दिली नाही. अखेरच्या चेंडुपर्यंत खिंड लढवली आणि सामना यशस्विपणे अनिर्णीत राखलण्यात यश मिळवले. या डावात भारताकडुन रिषभ पंतने सर्वाधीक ९७ धावांची खेळी केली. पण हनुमा विहारीच्या १६१ चेंडुत २३ धावांच्या खेळी या सामन्याला कलाटणी देणारी ठरली. पराभवाच्या गडद छायेतुन सामना अनिर्णीत राखण्याऱ्या भारतीय संघाचे सर्वस्तरातुन कौतुक झाले. अनिर्णीत असलेला हा सामना कोणत्याही ऐतिहासिक विजयापेक्षा तसुभरही कमी नव्हता. शतकी खेळीसाठी स्टिव्ह स्मिथला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!