🕒 1 min read
लातूर : लातूर शहरातल्या एका खाजगी कॉलेजमध्ये बी.ए. च्या व्दितीय वर्षात शिकणाऱ्या सोनू शेख या तरुणीने एका व्हिडीओ शेअर करत आपले जीवन संपवले आहे. या व्हिडीओमधून तरुणीने आपल्या वेदना सोशल मीडियावर मांडल्या आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयुष्याच्या परिक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत या तरुणीने जीवन यात्रा संपवली आहे.
आता मला हे सगळं सहन होत नाही, मी जीवन यात्रा संपवत आहे, माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये, असा व्हिडीओ पोस्ट करत सोनूने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे. ‘जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये. मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी. कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल.’ अशी विनवणी या तरुणीने या व्हिडिओ च्या माध्यमातून केली आहे.
जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, व्हिडीओ पोस्ट करत लातुरात तरुणीची आत्महत्या
@latur_police @TV9Marathi pic.twitter.com/fOlzGIa8eq— Akshay Adhav | अक्षय आढाव (@Adhav_Akshay1) June 13, 2021
सोनू शेख ही कॉलेज करत करत पार्ट टाइम जॉब देखील करायची. सोनू व तिच्या आईमध्ये काही कारणामुळे भांडणे झाली होती. यातूनच सोनुने टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतचं मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोल्हापूरकरांनो आम्हाला हौस नाही, थोडं सोसा !’, अजितदादांनी दिले निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत
- राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायचीये; उदयनराजेंचा गंभीर आरोप
- दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; उदयनराजें सोबतच्या भेटीनंतर संभाजीराजे कडाडले
- रोहित पवारांवर का बनवले जात आहेत मीम्स, काय आहे ‘नवे पर्व’ प्रकरण? जाणून घ्या थोडक्यात
- ‘आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही, जे व्यवहार्य असेल तेच आम्हाला द्या; पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

