🕒 1 min read
मुंबई : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ २ जुन रोजी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली हा भारतीय संघाची धुरा संभाळत आहे. यादरम्यान जे भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर नाही ते खेळाडू जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची धुरा शिखर धवन कडे जाण्याची शक्यता आहे.
विराट आणि शिखर हे दोन्ही खेळाडू दिल्लीत क्रिकेट खेळताना त्यांचा एक साथीदार क्रिकेटमध्ये करियर न घडवता अभिनय श्रेत्रात पुढे आला. हा दुसरा कोणी नसुन टिव्ही अभिनेता करण वाही हा होता. करण वाही हा शिखर धवनसोबत दिल्लीमध्ये १९ वर्षाखालील संघाकडून खेळला होता. करणने एकदा मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. यावेळी तो म्हणाला होता की ‘मी अंडर १९ मधून डीडीसिएसाठी खेळलो होतो. मात्र त्यावेळी जास्त पुढे जाण्याची संधी मला मिळू शकली नाही.’ २००३ मध्ये क्रिकेट सोडल्यानंतर तो अभिनयाकडे वळला.
मात्र त्यावेळी क्रिकेट सोडल्याचा करणला पश्चात्ताप होतो अशी कबुली करण वाहीने दिली. यानंतर करणने २००४ मध्ये रीमिक्स टीव्ही कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर दिल मिल गए, कुछ तो लोग कहेंगे, तेरी मेरी लव स्टोरीज यासारख्या अनेक टिव्ही कार्यक्रमातून त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या. दावत-ए इश्क, हेट स्टोरी-४ सारख्या चित्रपटात त्याने काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशात १३ कंपन्यांना कोरोना लस बनवण्याची परवानगी ; जेपी नड्डांची माहिती
- सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडलेत; भाजपचा प्रहार
- ‘गायकवाड अहवाल हा उद्धव ठाकरेंना समजलाच नाही’, संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका
- दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘तुटवडा असताना खासगी रुग्णालयांना लस कशी मिळते?’, ‘आप’चा केंद्राला सवाल


