Share

देशात १३ कंपन्यांना कोरोना लस बनवण्याची परवानगी ; जेपी नड्डांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आज केंद्रातील मोदी सरकारची 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत कोविड मदत सामग्रीस हिरवा झेंडा दाखवला. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. तसेच 13 कंपन्यांना कोरोना लस बनवण्यास परवानगी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जेपी नड्डा म्हणाले की, जे लोक आज लसीबाबत थट्टा करत आहेत, जेव्हा पंतप्रधान भारतातील उद्योजकांना लस बनवण्यास प्रोत्साहित करत होते, त्यावेळी विरोधी पक्षांनी भारताचे मनोबल सर्व प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम केले. सुरुवातीला 2 ते आता 13 कंपन्यांना लस बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांनंतर 19 कंपन्या कोरोनाची लस बनवण्यास सुरवात करतील. आता कोविड लसींच्या उपलब्धतेवर ओरडणाऱ्या लोकांना या लसीबद्दल पूर्वी शंका होती, असा टोला देखील जेपी नड्डा यांनी विरोधकांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!