अकोला : ममता बॅनर्जी यांना पाडण्याच्या नादात मोदी सरकारने कोरोनाची दुसरी लाट ओढवली. तर मोदींवर टीका केल्याने लोकांना अटक करणे गैर आहे. मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. गंगा किनाऱ्यावर मोठ्या संख्येत मृतदेहांचा खच पाहता ते रामराज्य चांगले होते, हे बेकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात कोविड रुग्णालयांसाठी विशेष परवानगीची गरज नसावी. सर्व रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानगीची घोषणा शासनाने करावी. जे डॉक्टर उपचार करणार नाहीत त्यांची नोंदणी रद्द करावी. त्याचबरोबर रुग्ण वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेशिवाय खासगी गाड्यांना परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे ते म्हणाले. राज्य शासन गाफील राहिले आणि असाच मृत्युदर वाढत राहिला तर मनुष्यवधाचा गुन्हा शासनावर पण दाखल करावा लागेल, असेही संकेत त्यांनी दिले.
कोरोना संकटात राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात लक्ष देतात. पण, त्यांच्या या कृतीने उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडण्यात आला. तिसऱ्या लाटेत बालके बाधित होतील, अशी शक्यता असताना मुख्यमंत्र्यांनी काहीच उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा – आशिष शेलार
- जयंत पाटलांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाला लावले कामाला
- आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी
- चंद्रपूर शहरात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी जोगरेवारांनी दिला 1 करोड 49 लाखांचा निधी
- तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
