Share

ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशील कुमारचा पत्ता सांगणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी जाहिर केले १ लाख रुपयांचे इनाम

Published On: 

दिल्ली : दिल्ली येथे ५ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये मोठा दंगा झाला होता. या वेळी कुस्तीपटुंच्या झालेल्या जबरदस्त हाणामारी झाली होती. या हाणामारीत पाच जण जखमी झाले होते. तर सागर राणा या कुस्तीपटुचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. याप्रकरणी मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनंतर गेल्या काही दिवसापासुन दिल्ली पोलिस सुशील कुमारचा शोध घेत आहे. मात्र त्यांना अद्याप यश मिळाले नसल्याने दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तिला १ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अजय हाही फरार आहे. त्याचा पत्ता सांगणाऱ्याला ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत ४ मे रोजी खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणाच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. सुशीलकुमारनं २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य तर २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!