Share

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट, मनपा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यावेळी महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली. मात्र या रुग्णालयांच्या उपचार दरात मोठी विसंगती दिसून येत आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात जास्तीचे दर लावलेले पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे सामान्य रुग्णांची मोठी पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने मनपा व जिल्हा प्रशासनाने उपचारांची नियमावली जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचार करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची संख्या शहरात वाढली आहे. रुग्णांवरील उपचाराची गरज लक्षात घेऊन पालिकेने त्यांना परवानगी दिली आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात सध्या १३ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तर ६७ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स आहेत. त्यात पालिका आणि शासनाचे हॉस्पिटल वगळता सर्व ठिकाणी उपचाराच्या दरांमध्ये भिन्नता दिसून येत आहे.

पालिका प्रशासनाने शहरात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर्स सुरु केले आहे. तसेच मेल्ट्रॉनच्या इमारतीत कोविड रुग्णालय देखील सुरू करण्यात आले आहे. मेल्ट्रॉनमधील उपचाराची पध्दत, सोईसुविधा लक्षात घेऊन या कोविड केअर सेंटरला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा दर्जा दिलेला आहे.

त्याशिवाय घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यासोबतच पालिकेने एमजीएम, धूत हॉस्पिटल, डॉ. हेडेगवार रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय यासह काही मोजक्या रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. रुग्णालयांचे दर ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. पालिका प्रशासक देखील यात पुढाकार घेऊ शकतात. या दोन्हीही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन खासगी रुग्णालयांचे दर निश्चित करावेत, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!