🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेत अनेकांना मदत केली. पहिल्या लॉकडाउनच्या वेळी त्याने शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. मदतीचे हे कार्य त्याने अविरतपणे चालू ठेवत दुसऱ्या लॉकडाउनमध्ये देखील तो लोकांना मदत करत आहे. कोरोना काळातील सोनू सूदचे काम पाहून अनेकजण त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करत आहेत.
https://www.instagram.com/p/COuwhQnDZY7/?utm_source=ig_web_copy_link
राखी सावंतने देखील सोनू सूद पंतप्रधान व्हायला हवा, अशी जाहिर इच्छा व्यक्त केली. त्याआधी अभिनेता वीर दास यानेही सोनूला पंतप्रधान बनवाला हवा, असे म्हणाला होता. सोशल मीडियावरही अनेक लोक तो पंतप्रधान बनावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र यावर आता सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने दिलेल्या प्रतिक्रियेच्या व्हिडीओमध्ये सोनू त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सला ज्यूसचे वाटप करताना दिसत आहे. यादरम्यान एकजण सोनूला पंतप्रधान बनण्यावर प्रतिक्रिया विचारतात. सोनूजी, सगळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात? तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न केल्यानंतर यावर सोनू अगदी नम्रपणे उत्तर दिले आहे. त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘जे जिथे आहे ते बरोबर आहे. मी सामान्य माणूस म्हणूनच बरा आहे, म्हणून तुमच्या सोबत तरी उभा आहे’, असे तो या प्रश्नावर उत्तर देतो. कोरोना काळात सोनू सूद रस्त्यावर उतरून लोकांना मदत करतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान सोनू लोकांसाठी दिवसरात्र लोकांसाठी झटत आहे. देशात ऑक्सिजन, आयसीयू बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशा स्थितीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सोनू दिवरात्र एक करतोय. लवकरच चार ऑक्सिजन प्लान्ट लावण्याची त्याची योजना आहे. यात महाराष्ट्रासह दिल्लीचा समावेश आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा सहन करत असणा-या चार राज्यांत हे प्लान्ट उभारले जाणार आहेत. त्यांच्या या मदत कार्यमुळेच लोकांकडून सोनू सूदने पंतप्रधान होण्याची इच्छा बोलून दाखवली मात्र त्याने दिलेली उत्तरमुळे पुन्हा एकदा त्याने लोकांची मन जिंकली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊन रणनिती ठरवा : कॉंग्रेस
- ‘गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…!’
- ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाची वाट झाली आहे खडतर
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

