🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा अजूनही मोठा तुटवडा आहे. यावरून दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकार कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले. संपूर्ण देशात नागरिक ऑक्सिजनसाठी रडत आहेत. नागरिकांचे जीव जात आहेत. तुम्ही कसे काय इतके असंवेदनशील होऊ शकता? लोकांच्या भावनेशी याचा संबंध आहे. अनेकाचे प्राण धोक्यात आहेत. तरीही तुम्ही डोळझाक करता. पण आम्ही असं करणार नाही, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने फटकारलं.
ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन IIT आणि IIM कडे द्या. ते तुमच्यापेक्षा उत्तम काम करतील. यात IIM च्या तज्ज्ञांना आणि बुद्धीवंतांचाही समावेश केला पाहिजे. दिल्लीतील मायाराम हॉस्पिटलकने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने ही टिपणी केली.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी आता कमी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला करण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठ्यात कपात करावी. ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. यामुळे आपत्कालीन स्थिती नागरिकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असं अॅमिक क्युरीकडून कोर्टात सांगण्यात आलं. यावरून कोर्टाने केंद्राला फटकारलं. दिल्लीला ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. कुठल्याही परिस्थितीत हा पुरवठा झालाच पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
- प.बंगालमधील हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी भाजपने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले
- दुसरा डोस घेणाऱ्यांना लसींची प्रतिक्षा कायम! आरोग्य अधिकाऱ्यांचे काळजी न करण्याचे आवाहन..
- आरोग्य सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही, खा. जलील यांच्या याचिकेवर सुनावणी
- दिलासादायक : राज्याच्या कोरोना पॉझिटिव्हीटी रेट मध्ये घसरण – राजेश टोपे
- मे महिन्यातील जेईई मुख्य परीक्षा स्थगित, शिक्षण मंत्र्यांची घोषणा


