Share

कोरोना चाचणी करण्यास सांगितल्याने तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ

Published On: 

🕒 1 min read

बीड : मास्क न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडवले आणि अँटिजन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने पथकातील अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत चाचणीला विरोध केला. ही घटना अंबाजोगाईतील सावरकर चौकात घडली. याप्रकरणी युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जबरदस्तीने अँटिजन चाचणी करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून बीड जिल्ह्यात सुरुवात झाली. यासाठी अंबाजोगाई शहरात पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास वेणुताई महिला महाविद्यालयासमोर तहसीलदार विपिन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, महसूल व न.प.चे कर्मचारी, पोलिस हे अँटिजन टेस्ट ड्राइव्हची कारवाई करत होते.

यावेळी प्रवीण राजाभाऊ शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) हा तरुण विनामास्क त्याच्या दुचाकीवरून (एमएच २० बीबी ९२७३) सावरकर चौकाकडून येत होता. पथकाने त्याला अडवून अँटिजन चाचणी आणि विनामास्क असल्याने दंड भरण्याबाबत सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या प्रवीणने सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण आणि अँटिजन चाचणीला विरोध केल्याप्रकरणी प्रवीण शेपवर अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!