🕒 1 min read
नवी दिल्ली : दि. २ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. तृणमूलच्या दंगेखोरांनी भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे या हिंसाचारप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. भाजप प्रवक्ते आणि वरिष्ठ वकील गौरव भाटिया यांनी एक याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर होत असलेला हिंसाचार, हत्या आणि अत्याचांराच्या घटनांची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
A petition has been filed in the Supreme Court seeking directions to the Centre to deploy central protection forces, including armed forces, for the restoration of law and order in West Bengal. pic.twitter.com/beCOmwHjkH
— ANI (@ANI) May 4, 2021
भाटिया यांनी याचिकेत आरोप केला की, तृणमूल काँग्रेसचे सदस्य अशा लोकांना निशाणा बनवत आहेत ज्यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मत दिले होते. दरम्यान, कोलकात्यात अभिजीत सरकार यांच्या झालेल्या हत्येचा उल्लेख करत भाटिया म्हणाले, ‘ही घटना याचं प्रतिक आहे की, टीएमसीच्या छत्रछायेखाली पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा नंगानाच सुरू आहे’
सीबीआय चौकशीशिवाय पश्चिम बंगाल सरकारला या घटनांबाबत दाखल एफआयआर आणि या घटनांमध्ये सामिल लोकांच्या अटकेसंबंधी स्टेट्स रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. तृणमूलचा पोलीस आणि इतर संस्थावर दबाव असल्याने आतापर्यंत याप्रकरणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हाही दाखल झालेला नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मे महिन्यातील जेईई मुख्य परीक्षा स्थगित, शिक्षण मंत्र्यांची घोषणा
- ‘आरोग्य सेवेत मानवी चुका सहन झाल्या तर पाहा..’, मंत्री मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा
- ‘कर्जासाठी बँका बंद, गांजा पेरण्यासाठी परवानगी द्या’, शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘स्वत:साठी घर बांधण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवा’, प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
- ट्विटरची कंगना रनौतवर मोठी कारवाई ; कंगनाचे ट्विटर हँडल सस्पेंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

