नागपूर – नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना परिस्थिती तीव्र होत असताना नागरिकांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात कोरोनाचे ५ नवीन स्ट्रेन सापडले आहेत. दिल्लीवरून आलेल्या अहवालानुसार ३५ नमुन्यांमध्ये हे नवीन स्ट्रेन आढळून आलेत. सर्दी, खोकला, ताप, अतिसार अशी या नव्या स्ट्रेनची प्रमुख लक्षणे आहेत.
नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर शासकीय वैद्यकीय विद्यालयात आलेल्या संशयित रुग्णाचे हे नमुने एनआयव्ही आणि दिल्लीच्या एनसीडीसीला पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला आहे. यात ७४ पैकी ३५ नमुन्यांमध्ये ५ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असल्याचे समोर आले आहे. यातील २६ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या वतीने सांगण्यात आले. नव्या म्युटेशनमध्ये कोरोनानंतरच्या प्रतिकारशक्तीचाही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.
डबल म्युटेशन म्हणजे एकाच जीन्समध्ये दोन पद्धतीने बदल झालेले आहेत. हे मानवासाठी अधिक घातक ठरू शकतात. जर पूर्वी कोरोना झाला असेल आणि त्याने कोरोनावर मात केल्यास त्याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण, नवीन म्युटेशनमध्ये या रोग प्रतिकारशक्तीचा फायदा होत नसल्याने पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरची कंगना रनौतवर मोठी कारवाई ; कंगनाचे ट्विटर हँडल सस्पेंड
- बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त
- आता ‘या’ मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लगावली चपराक
- ‘प्रीती शर्मा मेनन यांचा हास्यास्पद आरोप, त्यांनी आधी मराठी शिकावे आणि कायदाही समजून घ्यावा’
- राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू असल्याचा शिंगणेंचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

