Share

आता ‘या’ मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लगावली चपराक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- मद्रास उच्च न्यायालयाच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी एखाद्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडली जाणारी तोंडी मतं वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घ्यायाला परवानगी दिली,त्यामुळे दुसऱ्या लाटेला एकटा निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं सांगत,त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं.न्यायालयाचं मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं,खुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबतच्या विधानाला, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून, माध्यमांना रोखण्याची विनंती केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.यावेळी न्यायालयानं, उच्च न्यायालयं लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ असून,त्यांचं मनोबल कमी करु शकत नाही, असं सांगितलं.आणि फक्त वक्तव्याच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली.

यावेळी निवडणूक आयोगाच्या वतीने बाजू मांडताना वरिष्ठ विधिज्ज्ञ राकेश द्विवेदी म्हणाले, ‘न्यायालयाकडून तोंडी व्यक्त केली जाणारी मते प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना थांबवायला हवं. तसेच न्यायालयाच्या तोंडी मतावरून गुन्हेगारी तक्रार दाखल करू शकत नाही.’ त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले,’न्यायालयात होणाऱ्या चर्चेच वार्तांकन न करण्यास माध्यमांना सांगू शकत नाही. अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा वकील आणि न्यायाधीशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये माध्यमे शक्तिशाली पहारेकरी आहेत,’ असं मत न्यायालयाने नोंदवलं.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!