🕒 1 min read
मुंबई : सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. सदर वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’, असं पूनावाला यांनी म्हंटल आहे. यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे. असं देखील आदर पूनावाला पुढे म्हणाले होते.
तर शिवसेनेतील काही गुंडांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात सुभाष देसाई यांनी नमूद केले आहे की, राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली आहे.
Today in the @IndiaToday election coverage, their anchor, @rahulkanwal cooked up a lie to accuse the ShivSena of threatening Adar Poonawalla. This baseless piece of journalism is nothing but an attempt to malign the party. Our letter to India Today Group pic.twitter.com/mlRTqnHAuy
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) May 2, 2021
दरम्यान, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कोणी धमक्या दिल्यास त्यांनी पोलिस विभागाकडे तक्रार करावी. राज्य पोलिस निश्चितच गांभीर्यांने या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कारवाई करतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघाबाबत आयसीसीचा घेणार मोठा निर्णय?
- ‘अदर पुनावालांची सुरक्षा वाढवली, धमक्या देणाऱ्यांना शोधून कारवाई करणार’
- अन् रिषभ पंतच्या हातून सुटली बॅट….; व्हिडीओ व्हायरल
- अजित पवारांना गर्व झाला होता तो पंढरपुरात मोडून काढला : पडळकर
- ‘रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

