🕒 1 min read
औरंगाबाद : आर्थिक वादातून वादग्रस्त वकीलाने तरुण व्यापा-यास चाकूने भोसल्याचा खळबळजनक प्रकार जिन्सी पोलीस ठाण्यानजीक असलेल्या नागसेन कॉलनीत १ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात वकील मोहम्मद फरहान लतीफ याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडेगावातील मोहम्मद जाहेद कलीमोद्यीन सिद्दीकी (२७) हा व्यापारी आहे. सिद्दीकी आणि मोहम्मद फरहान हे दोघे जुने मित्र आहेत. नागसेन कॉलनीत जाहेद आणि फरहान एकमेकांना भेटले. त्यावेळी सफरचंद विक्रीचे पैसे फरहान याने जाहेद याला मागितले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून फरहान लतीफ याने जाहेदच्या पोटात तीन वेळा चाकु खुपसला.
त्यानंतर फरहानने तेथून पळ काढला. हा प्रकार पाहून नागरिकांनी रक्तबंबाळ अवस्थेत जाहेद याला उपचारासाठी घाटीत दाखल केले. त्याचावर सध्या घाटीतील वार्ड क्र. १९ मध्ये उपचार सुरु आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिन्सी पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक साईनाथ गिते करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अर्धशतक करताच डु प्लेसिसने रचल्या खास विक्रम; हा विक्रम करणारा चेन्नईचा पहिलाच खेळाडू
- ‘महाविकास आघाडीची पूर्ण ताकद पण पंढरपुरात भाजपचा आमदार, हा जनतेचा कौलच !’
- चेन्नईच्या अंबाती रायडुने फोडले मुंबई इंडियन्सचे फ्रिज; व्हिडीओ व्हायरल
- ममता दीदींचा ‘खेला’ पाहून बडे नेतेही चक्रावले ; भाजपचे बडे नेते पराभवाच्या छायेत
- ‘बंगालमध्ये सत्तेमध्ये जरी नाही आलो तरी जनतेच्या विकासासाठी भाजपा अविरत काम करत राहील


