Share

गारखेड्यात दुकानाला आग लागून १५ लाख रूपयांचे नुकसान

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील विशालनगर येथे असलेल्या वॉटर फिल्टरचे स्पेअर पार्ट विक्रीच्या दुकानाला आग लागून जवळपास १५ लाख रूपयांचे नुकसान झाले. दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी (दि.२) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

गारखेडा परिसरातील विशालनगर येथे राहणा-या प्रकाश विभुते (वय ३९) यांचे विशालनगर येथे पिवर वॉटर अपलाईस नावाचे दुकान आहे. या दुकानात वॉटर फिल्टरचे स्पेअरपार्ट आणि इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले होते.सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रकाश विभुते यांचे दुकान बंद आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानातुन धुर येत असल्याचा प्रकार आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना आणि दुकानमालक प्रकाश विभुते यांना दिली. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत दुकानातील जवळपास १५ लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, माजी नगरसेवक राजू वैद्य, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!