औरंंगाबाद : लग्नाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यास पुंडलिकनगर पोलिसांनी जेरबंद केले. दिपक जनार्दन सरकटे (वय २३, रा.विश्रांतीनगर, गल्ली नंबर ४, गारखेडा परिसर) असे तलवारीने केक कापणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून केक कापण्यासाठी वापरलेली तलवार जप्त केली असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी रविवारी (दि.२) कळवली आहे.
एका खासगी बँकेसाठी कमीशनवर वसूलीचे काम करणाऱ्या दिपक सरकटे याच्या लग्नाचा १ मे रोजी वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिपक सरकटे व त्याच्या पत्नीने तलवारीने केक कापला होता. सरकटे दांम्पत्याचा तलवारीने केक कापतांनाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता.
याची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलिस अंमलदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, दिपक जाधव, अजय कांबळे आदींच्या पथकाने दिपक सरकटे याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी दिपक सरकटे याने पलंगावरील गादीखाली लपवून ठेवलेली तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिपक सरकटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्धशतक करताच डु प्लेसिसने रचल्या खास विक्रम; हा विक्रम करणारा चेन्नईचा पहिलाच खेळाडू
- ‘महाविकास आघाडीची पूर्ण ताकद पण पंढरपुरात भाजपचा आमदार, हा जनतेचा कौलच !’
- चेन्नईच्या अंबाती रायडुने फोडले मुंबई इंडियन्सचे फ्रिज; व्हिडीओ व्हायरल
- ममता दीदींचा ‘खेला’ पाहून बडे नेतेही चक्रावले ; भाजपचे बडे नेते पराभवाच्या छायेत
- ‘बंगालमध्ये सत्तेमध्ये जरी नाही आलो तरी जनतेच्या विकासासाठी भाजपा अविरत काम करत राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

