🕒 1 min read
औरंगाबाद: देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. सुरुवातील कोरोना योद्ध्यांना तसेच वृद्ध नागरिकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील तसेच इतर आजाराने बाधित नागरिकांना लस देण्यात येत आहे. आता १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करणारे एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केले आहे, कोरोनावर मात करण्यासाठी देशात १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या स्तुत्य निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे सध्या सर्वात मोठे शस्त्र आहे, असे एक पोस्ट त्यांनी शेअर केले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील प्रत्येकाचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या स्तुत्य निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे सध्या सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे यामध्ये तरी
— Satish Chavan (@satishchavan55) April 20, 2021
लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरु आहे, मात्र यात कुठल्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये तसेच सर्व पक्षांनी मतभेद तसेच पक्षभेद विसरून एकत्रित येऊन या मोहिमेला चांगला पाठींबा द्यावा, असे मत अनेक नागरिकांनी आ. चव्हाण यांच्या पोस्टवर कमेंट केले आहेत. देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे त्यामुळे केंद्र तसेच राज्य पातळीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत.


