🕒 1 min read
औरंगाबाद : एकीकडे कोरोनाचे सावट असतांना कोविड योद्धा म्हणून वैद्यकीय अधिकारी गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत. त्यांना वैद्यकीय सेवेत कायम करावे अशी मागणी वारंवार करूनही ती मान्य झाली नसल्याने गुरुवारी (दि.१५) महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम बंद ठेऊन संप पुकारण्यात आला.
शासनाच्या अधिनस्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर रजा न घेता तसेच क्वारन्टाईन लिव्ह न घेता काम करत आहेत. असे असतांनाही अद्यापही कंत्राटी पध्दतीने काम करण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करावे तसेच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करूनही मागण्या मान्य झालेल्या नाही. त्यामुळे आज एकाच वेळी महाराष्ट्रातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.
शहरातील घाटीतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास येत्या २२ तारखेला बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.आनंद बरगाले, तसेच डॉ. विकास राठोड, डॉ. संजय वाकुडकर आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळात ग्रामपंचायतींवर बरसणार पैसाच पैसा, हसन मुश्रीफांची मोठी घोषणा
- कोरोनाच्या या संकटात एकमेकांची साथ गरजेची!
- मनसेचे नांदेडचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन
- टाटा मोटर्सने थांबवलं राज्यातील ‘या’ शहरातील उत्पादन
- परवानगी नसतांना कोरोना बाधितावर केले उपचार.. झाले असे काही!


